शेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदी पूल रस्त्याची तात्काळ डागडुजी करा…

गौरांग शेर्लेकर; अन्यथा आंदोलन उभारणार…

बांदा/प्रतिनिधी
शेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदी पुल रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गांवरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. रहादारीचा मुख्य रस्ता असल्याने तात्काळ या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा आंदोलन कारण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे सावंतवाडी तालुका सदस्य गौरांग शेर्लेकर यांनी दिला आहे.
बांदा शहरात येण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने शेर्ले व मडुरा पंचक्रोशीतील ९० टक्के वाहतूक येथून होते. शाळकरी तसेच बाजारासाठी बांद्यात येणारे वाहनचालक या रस्त्याने प्रवास करतात. या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेण्या खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचा इशारा श्री शेर्लेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page