⚡मालवण ता.२७-: तोंडवळी येथील सुरूबन येथे वन खात्याच्या क्षेत्रातून जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांब रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण काम वन व पर्यावरण खात्याच्या परवानगी अभावी रखडले आहे, परवानगी घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही कार्यवाही करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात १ मार्च रोजी तोंडवळी सुरूबन येथे बेमुदत उपोषणस बसण्याचा इशारा तोंडवळी सरपंच , उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांनी
उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम कणकवली यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तोंडवळी येथील सुरूबनातून जाणाऱ्या दीड किमी लांबीच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण होणे आवश्यक आहे. याबाबत सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागास २०१८ पासून पत्रव्यवहार चालू आहे. मात्र पर्यावरण व वन विभागाकडून आवश्यक असलेली परवानगी घेणेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त बनले असून सार्वजनिक बांधकाम विरोधात तोंडवळी सुरुबन येथे बेमुदत उपोषण छेडणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
