61 कोटीची स्वतंत्र नळ पाणी योजना केली तर शहराचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघेल…

राजेंद्र मेस्त्री यांनी व्यक्त केला विश्वास

देवगड (प्रतिनिधी)

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी वण वण करावी लागत असताना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रम योजनेअंतर्गत शिरगाव-पाडाघर ५४ कोटी नळपाणी योजनेला संबंधित विभागाकडून तांत्रिक त्रुटीमुळे आत्तापर्यंत चार वेळा रेड सिग्नल मिळाल्याने कोर्ले-सातंडी धरणावरून देवगड जामसंडे शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रम योजनेअंतर्गत ६१कोटीची स्वतंत्र नळ पाणी योजना केली तर शहराचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघेल असा विश्वास जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र मिस्त्री यांनी सभागृहात व्यक्त केला.
यावेळी नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी संतोष जिरगे, जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र मिस्त्री तसेच सर्व सत्ताधारी,विरोधक नगरसेवक उपस्थित होते.
देवगड जामसांडे शहरातील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रम योजनेअंतर्गत  शिरगाव-पाडाघर  योजनेवरून ५४ कोटीची नळ पाणी योजना प्रस्तावित करण्यात आली होती परंतु सातत्याने त्या नळपाणी योजनेला संबंधित विभागाकडून तांत्रिक त्रुटीमुळे आत्तापर्यंत सातत्याने रेड सिग्नल मिळत असून शासनाकडून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रम योजनेअंतर्गत घोणसरी धरणावरून नळ पाणी योजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आला परंतु घोणसरी धरणावरून सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित असून एवढी मोठी योजना करून नगरपंचायतीला याची देखभाल दुरुस्ती खर्च परवडणार नाही तसेच घोणसरी धरणावर पिण्याच्या पाण्याचा ठराविक पाणीसाठा असल्याचे शाखा अभियंता राजेंद्र मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
परंतु कोर्ले-सातंडी धरणावरून शहराला स्वतंत्र नळपाणी योजना केली तर सुमारे ६१ कोटी खर्च अपेक्षित कोर्ले-सातंडी धरणावर पिण्याच्या पाण्याचा साठा देखील घोणसरी धरणापेक्षा जास्त असून शिरगाव-पाडाघर योजनेवरून नळ पाणी योजना केली तर ५४ कोटी खर्च अपेक्षित आहे परंतु शिरगाव पाडाघर नळ योजनेवरून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो तसेच शासनाकडून शिरगाव-पाडाघर या स्वतंत्र नळ पाणी योजनेला संबंधित विभागाकडून आतापर्यंत चार वेळा रेड सिग्नल देण्यात आला आहे.मात्र कोर्ले-सातंडी धरणावरून देवगड-जामसंडे शहराला स्वतंत्र नळ पाजणी योजना होऊ शकते आणि शहराला मुबलक असा पाणीसाठा देखील उपलब्ध होऊ शकतो असा विश्वास शाखा अभियंता राजेंद्र मिस्त्री यांनी सभागृहात उपस्थित नगरसेवकांना दिला.
यावेळी विरोधी नगरसेवकांनी कोर्ले-सातंडी धरणावरून पाणीसाठा आणण्यासाठी आपल्याला ७ कोटी रुपये जास्त मोजावे लागत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले तसेच शिरगाव पाडाघर ५४ कोटीच्या नळ पाणी योजनेसाठीच आपण प्रयत्न करूया परंतु उपस्थित सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधी नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिले की,शिरगाव पाडाघर नळ योजनेवरील नगरपंचायतीने पाठवलेला प्रस्ताव तांत्रिक त्रुटीमुळे आत्तापर्यंत चार वेळा परत आला असल्याचे नगरसेवक बुवा तारी यांनी विरोधी नगरसेवकांच्या लक्षात आणून दिले परंतु विरोधी नगरसेवक प्रणाली माने,तन्वी चांदोसकर, शरद ठुकरुल सभागृहात सांगितले की,आम्ही आमच्या वरिष्ठान मार्फत प्रस्तावाला मंजुरी आणण्यासाठी प्रयत्न करू असे सभागृहात स्पष्ट करताच संबंधित विभागाकडून शिरगाव-पाडाघर नळ पाणी योजनेवरील प्रस्ताव आतापर्यंत तांत्रिक त्रुटीमुळे चार वेळा परत आला असून या नळ योजनेवर जास्त वेळ घालविला तर शहरातील जनतेला नेहमीच पाणी प्रश्नाचा सामना करावा लागेल त्यामुळे कोर्ले-सातंडी धरणावरून स्वतंत्र नळ पाणी योजना करण्यासाठी सर्वांनी भर द्यावा अशी देखील विनंती नगरसेवक बुवा तारी यांनी सभागृहात केली.

You cannot copy content of this page