डॉ जयेंद्र परुळेकर यांची आवाज थांबविण्याची मागणी
सावंतवाडी ता.२२-: येथील डॉक्टर जयेंद्र परुळकर हॉस्पिटल शेजारी सुरू असलेल्या इमारती बांधकामाचे काम सुरू असताना येत असलेल्या आवाजामुळे रुग्णांना, शेजाऱ्यांना त्रास होत आहे. या होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन हा आवाज थांबवण्यात यावा अशी मागणी डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. ते येथील सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
