⚡मालवण,ता.१९-: तारकर्ली रांजनाल्या येथील पुलाच्या कामाची मुदत संपूनही रखडलेल्या जोडरस्त्याच्या कामास अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
तारकर्ली रांज नाल्यावरील पुलाच्या कामाची मुदत संपूनही ते काम अपूर्ण होते. परिणामी ग्रामस्थ व पर्यटकांना या मार्गावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सुरेश बापर्डेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तर माजी खासदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते या पार्श्वभूमीवर आजपासून या पुलाच्या जोड रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
