सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांना आ नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले वंदन

उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची, शिवप्रेमींची मोठी उपस्थिती

मालवण दि प्रतिनिधी
‘जय भवानी…जय शिवाजी’ ‘ हर हर महादेव ‘ अशा घोषणांनी सारा आसमंत दणाणून सोडत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने
आज सकाळी मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिक आणि शिवप्रेमींसमवेत मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर जात शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केले यावेळी आम वैभव नाईक यांच्या हस्ते छत्रपतींच्या मूर्तीस जिरेटोप, पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिक व शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान करीत भगवे झेंडे हाती घेतल्याने सिंधुदुर्ग किल्ला परिसर भगवामय बनला होता.

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचे नवीन सिंहासनाचे बांधकाम केल्यानंतर आज प्रथमच आमदार वैभव नाईक तसेच शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला या
किल्ल्यात देशातील एकमेव असे महाराजांचे शिवराजेश्वर मंदिर आहे. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून छत्रपतींच्या सिंहासनाचे नवीन बांधकाम नुकतेच करण्यात आले. यानंतर आज प्रथमच किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गायन सादर करण्यात आले. लहान मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. तालुक्यातील शालेय विद्यार्थी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महिलाही पारंपरिक वेशभूषा परिधान करत या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, मंदार ओरसकर, भाई कासवकर, अनुष्का गावकर, तळगाव सरपंच लता खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, मालवण महिला आघाडी तालुकाप्रमुख श्वेता सावंत, निनाक्षी शिंदे, महेंद्र म्हाडगूत, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, उमेश मांजरेकर, रणजीत परब, वायरी सरपंच भगवान लुडबे, राजू परब तालुक्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व सर्व शिवसैनिक, शिवप्रेमी उपस्थित होते.

You cannot copy content of this page