प्रदेश सचिव निलेश राणे यांचे नेतृत्व
शिव घोषात शिवराजेश्वर मंदिरात;छत्रपती शिवाजी महाराज यांना केले वंदन
मालवण दि प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज मालवणात आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने भाजप प्रदेश सरचिटणीस , माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ ते बंदर जेटी पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. या रॅलीनंतर मिरवणूकीने जात माजी खासदार निलेश राणे यांनी किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपतीना अभिवादन केले
मालवण भाजपयुवा मोर्चाच्यावतीने आज सकाळी शिवजयंतीचे औचित्य साधून पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोरयाचा धोंडा येथे पूजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होते यानंतर कुंभारमाठ शिवाजी पुतळा ‘येथे भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुंभारमाठ ते मालवण बंदर जेटी पर्यंत भव्य मोटरसायकल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बंदरजेटी येथून ढोल ताशांच्या गजरात सर्व पदाधिकारी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात गेल्यानंतर श्री राणे यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विजयाबाबत साकडे घालण्यात आले
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, महेश मांजरेकर, अशोक तोडणकर, राजन गावकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, राजू बिडये, अभय कदम, आबा हडकर, महेश सारंग, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पूजा करलकर, चारुशीला आचरेकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, पूजा वेरलकर, निषय पालेकर, राकेश सावंत, बाबा मोंडकर, अवी सामंत, मोहन वराडकर, उत्तम पेडणेकर, भाई मांजरेकर आदी व इतर सहभागी झाले होते
