वायरी येथे राष्ट्रीय काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

⚡मालवण ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मालवण वायरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुक्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांच्यातर्फे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद लुडबे यांनी केले

यावेळी काँग्रेचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष तळवडेकर, वायरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा जिल्हा युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगांवकर, ग्रामस्थ प्रदीप वेंगुर्लेकर, दत्ता मयेकर, डीचवलकर, श्री. मयेकर, ऍड. अमृता अरविंद मोंडकर व इतर पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page