सावंतवाडी दोडामार्ग मराठा मंडळ पाच मुलांना घेणार दत्तक

हळदीकुंकू आणि सत्कार कार्यक्रमात संजू परब यांची माहिती;समाजासाठी योगदान देणाऱ्या सामाज बांधवांचा, भगिनिंचा केला सत्कार

⚡सावंतवाडी ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा बांधवांचा सत्कार आणि भगिनिंसाठी हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी घेतो. ज्या व्यक्ती समाजाला योगदान देतात, त्यांचा येथे सत्कार केला जातो. यातून अन्य बांधवांना समाज कामाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश आहे. आमच्या मंडळाने यावर्षी पासून समाजातील पाच गरजवंत विद्यार्थी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वांची मदत लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५० वर्षात उभारलेले मराठा साम्राज्य व त्यासाठी औरंगजेब यांच्या विरोधात दिलेला लढा ही सोपी गोष्ट नव्हती, असे प्रतिपादन मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी दोडामार्गच्यावतीने आयोजित हळदीकुंकू आणि सत्कार कार्यक्रमात बोलताना माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काढले.

यावेळी समाजात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सौ.संजना परब, अर्चना सावंत दिपाली भालेकर,सुनील राऊत,विनोद सावंत आधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page