सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्याहस्ते झाले प्रकाशन
⚡मालवण ता.१३-: सध्याच्या नातेसंबंध कोरडे होत चाललेल्या काळात वासंती किणीकर यांनी आपले गुरुवर्य आणि सहकारी शिक्षक यांच्या बद्दल अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहपुर्वक संबंध उलगडून सांगणारं स्नेहबंध हे पुस्तक लिहीले ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. मुळात त्यांच्या मनात दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा असल्यामुळेच त्यांच्याकडून हे लिखाण होऊ शकले असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी येथे बोलताना केले
कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती वासंती किणीकर लिखित गुरुजन आणि सहकारी शिक्षक अशा ४१ व्यक्तीमत्वांबद्दल कृतज्ञता मांडणारे ” स्नेहबंध ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साहित्यिक , कवी अजय कांडर यांच्या हस्ते वराडकर हायस्कूल कट्टा च्या सभागृहात संपन्न झाला.त्यावेळी कांडर हे बोलत होते
यावेळी व्यासपीठावर लेखिका श्रीमती वासंती किणीकर , संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर , उपाध्यक्ष तथा सरपंच शेखर पेणकर , सचिव सुनिल नाईक , खजिनदार रवींद्रनाथ पावसकर , सहसचिव साबाजी गावडे , संचालक शिवराम गुराम, महेश वाईरकर, स्वाती वराडकर , पेंडूर हायस्कूल संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे प्रमुख कार्यवाह दिपक भोगटे , कवयित्री व लेखिका तांबे मॅडम श्रीमती विजयश्री देसाई , स्कूल कमिटी चेअरमन बापू वराडकर , मुख्याध्यापक संजय नाईक , माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल फणसेकर , माजी मुख्याध्यापक सर्जेराव पाटील , सुरेश कदम , वराडकर काॅलेजचे प्राचार्य जमदाडे , इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषीकेश नाईक , तसेच माजी विद्यार्थी , सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि कल्पवृक्ष देउन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्याध्यापिका श्रीमती वासंती किणीकर लिखित स्नेहबंध या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी वराडकर हायस्कूल चे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी नुकतेच २५० बालकलाकारांचा सहभाग असलेले शिवचरित्रावरील महानाट्य यशस्वीरीत्या सादर केल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी सन्मानचिन्ह देउन गौरव केला.
फोटो माहिती :-
वराडकर हायस्कूल कट्टाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती वासंती किणीकर लिखित स्नेहबंध या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रसिद्ध कवी अजय कांडर , लेखिका वासंती किणीकर, संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर , सरपंच शेखर पेणकर , सुनिल नाईक , बाबाराव राणे आणि इतर मान्यवर .
( छाया :- अमोल गोसावी )
