सरपंच सावित्री पालेकर यांनी केले उद्घाटन
⚡आंबोली,ता.१३-: येथील ग्रामपंचायतीत स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच सौ.सावित्री पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा उद्योग क्रेंद्राचे महाव्यवस्थापक श्री.दामले,
जिल्हा उद्योग क्रेंद्राचे व्यवस्थापक श्री.पाटील , प्रकल्प अधिकारी महाराष्र्ट उघोजकता विकास क्रेंद्राचे श्री.गावडे तसेच एम एस सिंधू काॅयर ईंड्रस्ट्रिचे अध्यक्ष श्री.बोरवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅक आंबोली चे शाखा व्यवस्थापक श्री.श्यामसुंदर पोकळे, गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली ग्रा.पं.सदस्य साक्षी गावडे, तसेच बॅक ऑफ ईंडीयाचे आंबोली शाखेचे निवृत्त रोखापाल श्री.अनंत गावडे , माजी ग्रा.पं.सदस्य संतोष पालेकर,महिला बचत गट सी आर पी रोहीनी गुरव, आंबोली,चौकूळ व गेळे ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबीराच्या ठिकाणी सुमारे विस जनांचे स्वयंरोजगारा साठीचे प्रस्ताव अर्ज पुढील कार्यवाही साठी सादर करण्यात आले.तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक माहीती देण्यात आली.
