सुशांत खिल्लारे मृत्यू प्रकरणी संशयित तुषार पवारला न्यायालयीन कोठडी

⚡सावंतवाडी ता.१३-: सुशांत खिल्लारे खूनप्रकरणी सावंतवाडी पोलिस कोठडीत असलेल्या तुषार पवारची कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर अन्य पाच जणांना १६ तारीख पर्यत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली.

  सुशांत खिल्लारे खून प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या आबासो बाबासो पाटील, राहूल कमलाकर माने, प्रदिप विजय बळीवंत, स्वानंद भारत पाटील, राहुल बाळासाहेब पाटील या पाच जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी सकाळी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी तसेच अन्य पुरावे गोळा करण्यासाठी वाढीव पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली. त्यानुसार या पाचही जणांना तीन दिवसाची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
You cannot copy content of this page