*सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आयोजित मत्स्य महोत्सवाचा थाटात समारोप…

*मत्स्य महोत्सवास नागरिकांनी दिला उदंड प्रतिसाद

*💫सावंतवाडी दि.१४ विनय वाडकर-:* सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मत्स्य महोत्सवाचे आज थाटात समारोप करण्यात आला आहे. यावेळी तीन दिवस घेण्यात आलेल्या स्पर्धांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. तसेच हा महोत्सव यशस्वी करण्यात दिवस रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दोन दिवस घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा नृत्य आविष्काराची मेजवानी प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आली होती. या तीन दिवस चाललेल्या मत्स्य महोत्सवाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. यावेळी… भाजप प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधू आत्मनिर्भर योजनेचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, निलक्रांती संस्थेचे रविकिरण तोरसकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक अँड परिमल नाईक, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर , नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, नगरसेविका उत्कर्ष सासोलकर , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page