*जिल्हा बँकेने सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद

सर्वसाधारण सभेत अध्यक्षांसह संचालकांचा बँक सभासदांनी केला गौरव

सिंधूदुर्गनगरी ता १४ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देत बँकेची सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत 83 टक्के कर्जाचे वितरण करून या बँकेने एक आदर्श निर्माण केला आहे अशा शब्दात आजच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि संचालकांचा सर्वच बँक सभासदांनी गौरव केला. अभिनंदनाचा ठराव घेत बँकेच्या अत्याधुनिक कामकाज आणि पारदर्शकते बाबत जाणकार सभासदांनी आपली मते मांडली. सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीचे संचालक विरुद्ध भाजप संचालक असे शाब्दिक युध्द रंगेल म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा भरगच्च सभासदांच्या उपस्थितीत झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळून आज सकाळी 11 वाजल्यापासून सभासदांना मताचा अधिकार आणि सभागृहातील प्रवेशाबाबत ठराव एकत्रित करत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. शरद कृषी भवन येथे सकाळी बारा वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अनेक विषयावरून जिल्हा बँकेचे कौतुक करण्यात आले. बँकेने कर्ज वसुली बाबत चांगला निर्णय घेतला आहे. वसुली ही चांगली असल्याने नाबार्डच्या ऑडिट अ वर्ग मध्ये या बँकेचा सातत्याने असलेला समावेश हा कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोकांना आर्थिक मदत करत असताना शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी केलेल्या विविध योजना, पशु उत्पादनासाठी बँकेने सुरू केलेल्या योजना कौतुकास्पद असल्याचे मत सर्व सभासदांकडून मांडण्यात आले. मालवणचे नितीन वाळके यांनी अहवाल वाचनात आपल्या विविध प्रकारच्या सूचना केल्या. त्याची दखल संपूर्ण सभागृहाने घेतली तसेच सहकारातील जानकार श्री. वारंग तसेच एम.के. गावडे आदींनी या वेळी मत व्यक्त केले. सभागृहांमध्ये अहवालाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर माजी चेअरमन तथा विद्यमान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार आणि बँक माजी संचालक अ‍ॅड.अजित गोगटे यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी व्यासपीठावर बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, माजी अध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, संचालक विकास गावडे, अतुल काळसेकर, व्हीक्टर डांटस, प्रमोद धुरी, गुरुनाथ पेडणेकर, नीता राणे, प्रज्ञा परब, अविनाश माणगांवकर, विकास सावंत, आत्माराम ओटवणेकर, आ टी मर्गज, विद्याधर बांदेकर, नितिन शेट्ये, गुलाबराव चव्हाण, राजन गावडे, शरद सावंत, प्रकाश मोर्ये, दिगंबर पाटील, प्रकाश गवस, जिल्हा दूध संघाचे जिल्हाध्यक्ष एम के गावडे, प्रसाद रेगे, पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ प्रसाद देवधर यांच्यासह सभासद संस्थाचे पदाधिकारी, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा बँकेत शासकिय ठेवी राज्यातील 5 सहकारी बँकांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यात सिंधुदुर्ग बँकेचा समावेश असून आता या बँकेत शासकिय नोकरदारांचे पगार आणि ठेवी ठेवण्यात येतील अशी माहीती अध्यक्ष सतीश सावंत यांनी सभागृहाला दिली. तसेच ज्या कर्जदारांना प्रोत्साहनपर रक्कम येत्या अर्थसंकल्पाच्या तरतूदीनंतर मिळाणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी समिती गटीत केली असून यापुढील काळात बँक जमीन खरेदी, घर खरेदीसाठी कमी व्याजदर आकरण्याबाबत सभासदांच्या सुचनेचा विचार करेल असे सतीश सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page