आंबोलीतील सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी…

ग्रामस्थांचे निवेदन;कराड मधील खुनाचा गुन्हा तपास प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांचे अभिनंदन

आंबोली,ता.१०: आंबोलीत वाढते अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सजग राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक याना देण्यासाठी आंबोली पोलिसांकडे आज ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. परप्रांतीय कामगारांची नोंद पोलीस स्थानकात ठेवावी परप्रांतीय विक्रेत्या व इतर संशयित वाटेल अशा प्रकारच्या बाहेरच्या लोकांची माहिती पोलिसांनी ठेवावी केवळ माहिती न ठेवता ठेकेदारांना त्यांच्या कामगारांबाबत सक्त ताकीद देने आवशयक आहे.गावत अनुचित प्रकार घडू नयेत पर्यटन गाव आहे म्हणून सर्व प्रकार खपवून घेणे योग्य नव्हे.सामाजिक सुरक्षा राखणे आवश्यक आहे. पोलिसानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश सूचना देने आवश्यक आहे.कोणत्याही रस्त्याचे ठेकेदार आंबोलीत कोणी जरी आले तरी त्याने सर्व जबाबदारी सांभाळणे आवश्यक आहे.अधिकाऱ्यांनी देखील तशा खबरदारी घेणे आवश्यक आहे.यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत त्यामुळे भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत.आंबोलीत घाट परिसर आणि पर्यटन क्षेत्र तसेच आंतरजिल्हा पोलीस चौकी असल्याने या ठिकाणचे कर्मचारी कमी करू नये पुरेसे कर्मचारी या ठिकाणी असणे आवश्यक आहे.अनेक वेळा घटना घडतात त्यामुळे आंबोली पोलीस स्थानक सज्ज असणे आवश्यक आहे. अशी मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन शिवसेना विभाग अध्यक्ष बबन गावडे, काशीराम राऊत, अनिल चव्हाण ,सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गवंडे,दादा नाटलेकर यांनी आंबोली पोलीस नाईक दीपक शिंदे,ए. डी.बरागडे,अभिजित कांबळे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी हवालदार दत्ता देसाई यांनी ठेकेदार तसेच संबंधितांना बोलावून तशा सक्त सूचना देण्यात येतील आंबोलीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारी घेऊ असे सांगितले… आंबोली घाटातील मर्डर करून मृतदेह टाकल्या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलीसांचे अभिनंदन… यापूर्वी आंबोलीत इतर जिल्ह्यातील खून करून बॉडी आणून टाकायचे विल्हेवाट लावायचे.आंबोलीत बॉडी काढायचे मात्र त्यानंतर तपास संबंधित जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील पोलीस स्थानकात वर्ग करायचे.मात्र पुढे आरोपी किती किंवा आणखी काय प्रकरण हे निष्पन्न होऊन पुढे काय समजायचे नाही.मात्र आंबोली चा वापर अशा गुन्ह्यासाठी व्हायचा.यावेळी घटना कराड येथील असली तरी सिंधुदुर्ग पोलिसानी गुन्हा नोंद करून तपास केला आहे.आरोपी जरी सराईत नसले तरी घटना त्या जिल्ह्यातील असून सावंतवाडी पोलिसांनी त्याचा तपास करून न्यायालयात हजर करून चार्जशीट बनवत आहेत.त्यामुळे गुन्हेगारी साठी आंबोली घाटाचा वापर होण्यासाठी ब्रेक लागू शकतो.त्यामुळे इथे जरी घटना घडली नसली तरी गुन्हा वर्ग न करता सिंधुदुर्ग पोलिसांनी तत्परतेने तपास केला ही कौतुकाची बाब असल्याने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,उप अधीक्षक डॉ.रोहिणी सोळंखे आणि जिल्हा पोलीसअधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे अभिनंदन आंबोली ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page