देवगड
देवगड आगाराचे बहुतांशी मार्गफलक हे जीर्ण तुटलेल्या स्थितीत प्रसंगी फलकावरील नावे अस्पष्ट दिसत असल्याने प्रवासी थांब्यावर गाडी आल्या नंतरही प्रवाशांना ते फलक दिसत नसल्याने प्रसंगी प्रवासी फेऱ्या निघून जाणे,चुकीच्या प्रवासी फेरीत चढणे ,यात प्रामुख्याने जेष्ठ नागरिक याना सर्वाधिक फटका अस्पष्ट फलकांचा बसत आहे.यात लांब पल्ल्याच्या गाड्यांचे फलक हे अस्पष्ट पद्धतीचे तुटलेले प्रसंगी अर्धवट नावे असलेली झाल्याने प्रवासी वर्ग वारंवार गाडीची विचारणा करून हैराण होत आहेत.या कडे वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
अस्पष्ट फलक झाल्याने एसटी प्रवाशांचा होतोय गोंधळ
