⚡मालवण ता.०८-: मालवण येथील गजानन महाराज (शेगाव) भक्तमंडळातर्फे गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मालवण एसटी स्टॅण्डनजीकच्या श्रीराम मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त १२ रोजी पहाटे ५.३० वा. सनई-चौघडा वादन, सकाळी ७ वा. लघुरुद्र, १३ रोजी सकाळी ६ पासून दुपारी १२ पर्यंत गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण, ८ वा. गजानन महाराजांची महापूजा, दुपारी १२ वा. आरती व नैवेद्य, १ ते ३ झुणका भाकरी प्रसाद वाटप ४ पासून तिर्थप्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत भजन, ७.३० वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, १४ रोजी रात्री ८ वा. संत बाळूमामा कलामंच, मालवण यांचा ‘नवतरंग’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ज्या भाविकांना शिधा साहित्य द्यायचे असेल, त्यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत, तर ज्या भाविकांना झुणका-भाकर द्यायची असेल, त्यांनी १३. रोजी दुपारी १२ पर्यंत मंदिरात आणून द्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
