⚡मालवण ता.०८-: साहित्य, कला, व्यक्तित्व विकास मंच (साकव्य), नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्वरचित काव्य स्पर्धेत आचरा गावचे सुपुत्र मंदार सांबारी यांना यश प्राप्त झाले असून त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. देशभर पसरलेला साहित्यिकांचा हा काव्यमंच असून या मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक कवी-कवयित्री सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. कवी मंदार श्रीकांत सांबारी यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यासाठी त्यांना आनंद हा विषय देण्यात आला होता. त्यांनी आनंद विषयावरील अभंग सादर करत यश प्राप्त केले.
