⚡मालवण ता.०८-: शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा काळसे बागवाडीच्या पार्थ शंकर सूर्यवंशीने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. तो जिल्ह्यात तेरावा व तालुक्यात तिसरा आल्याबद्दल त्याचे ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले.
त्याला शिक्षक महेश कदम व मुख्याध्यापक शितल परुळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर यांचे सहकार्य लाभले.
