मालवण किनाऱ्यावर एनसीसी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.०८-: जागतिक पाणथळ दिनानिमित्त ५८ महाराष्ट्र मराठा बटालियन व मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभाग यांच्या वतीने मालवण बंदर जेती समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून पथनाट्य सादर करण्यात आली. या उपक्रमात सिंधुदुर्ग कॉलेजचे एनसीसी विद्यार्थी तसेच कट्टा वराडकर हायस्कुल व कॉलेजचे एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले होते.

पुनीत सागरी सुरक्षा अभियाना अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मालवण बंदर जेटीच्या दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून कचरा गोळा करण्यात आला. सका यावेळी सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत व सुंदर भारत तसेच सागरी सुरक्षा यावर तीन पथनाट्य सादर केली. यावेळी कट्टा वराडकर महाविद्यालय व सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत व सुंदर भारत या संकल्पनेवर साकारलेली विविध पोस्टर सादरीकरण केली. पोस्टर सादरीकरणात प्रथम क्रमांक नेहा कांदळगावकर (सिंधुदुर्ग महाविद्यालय), द्वितीय क्रमांक क्षितिजा खरवते (सिंधुदुर्ग महाविद्यालय) व श्रेया चांदरकर (वराडकर महाविद्यालय), तृतीय क्रमांक – प्रतीक्षा पवार व हर्षदा आढळगावकर (वराडकर महाविद्यालय) यांनी यश मिळविले.

यावेळी कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल (सेना मेडल प्राप्त), ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गचे सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ एम. आर. खोत, सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार यादव, कोस्टल पोलीस उपनिरीक्षक श्री. साठे, उपनिरीक्षक एस. पी. खांदारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. जे. धुरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. पेडणेकर, नगरपालिकेचे शहर समन्वयक निखिल नाईक व नगरपालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page