गणित अध्यापक मंडळाचे पाच पुरस्कार वेंगुर्ले तालुक्याला

उपक्रमशील मुख्याध्यापक, आदर्श गणित शिक्षक या पुरस्कारांचा समावेश

⚡वेंगुर्ला ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे यावर्षी पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षकांना जाहीर झाले आहेत. यात उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून उमेश वाळवेकर, प्रमोद कांबळे, तर आदर्श गणित शिक्षक म्हणून महेश चव्हाण, सी.एम.हरगुडे, दिलीप माने अशा ६ मुख्याध्यापकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.


या पुरस्काराचे वितरण ५ फेब्रुवारी रोजी वाडा-देवगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. वेंगुर्ला तालुक्यामधून उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे, तसेच आदर्श गणित शिक्षक म्हणून विद्यामंदिर परुळेचे महेश चव्हाण, सरस्वती विद्यालय आरवली-टांकचे मुख्याधापक सी.एम.हरगुडे व केंद्रशाळा उभादांडा नं.१चे मुख्याध्यापक दिलीप माने याची निवड करण्यात आली होती. गुणवंत अध्यापकाचे सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष वामन खोत, कार्यवाह तुकाराम पेडणेकर, तालुकाध्यक्ष देवानंद चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page