⚡सावंतवाडी ता.०८-: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हीची २६ जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झाल्याने तर राज्यस्तर कॅरम स्पर्धेत प्रणिता आयरे हिने दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळविल्याबद्दल त्यांचे दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यानी स्वागत केले.
प्रशालेच्या वतीने त्यांची शहरातून काढलेल्या मिरवणुकीत दरम्यान मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानासमोर हे स्वागत करण्यात आले यावेळी गजानन नाटेकर, श्री. नंदू शिरोडकर, श्री. नंदू गावडे, श्री. म.ल. देसाई, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. विश्वास घाग, श्री. सुरेश कदम, सौ. देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
