जनतेने प्रवासाला साथ आणि सहयोग द्यावा;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आनंद मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून आवाहन
⚡मालवण ता.०४-: देशाला आत्मनिर्भर बनविणारा, महासत्ता बनविणारा, माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणारा पक्ष म्हणजे भाजप पक्ष आहे. भाजप देशाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी प्रवास करीत आहे. त्याला तुमचा आशीर्वाद आणि साथ द्या. आम्ही या प्रवासातील वारकरी आहोत. यापुढेही तुमचा पाठिंबा आणि सहयोग मिळावा, असे आवाहन करतानाच विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्ययमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री देवी आई भराडीने आशीर्वाद देवो, अशी भावना केंद्रीयमंत्री तथा भाजपच्या आंगणेवाडी येथील आनंद मेळाव्याचे अध्यक्ष नारायण राणे यांनी या मेळाव्यात बोलताना केले.
