उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोकणावरील प्रेम बेगडी

एक लाख नोकऱ्या देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला केला खोटा विरोध;उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आनंद मेळाव्यात घणाघात

⚡मालवण ता.०४-: उद्धव ठाकरे शिवसेनेने कोकणचे केलेले नुकसान कोणाच्या लक्षात येणार नाही. अडिज वर्षाच्या सत्ता काळात ठाकरे सरकार नैसर्गिक नुकसानी झालेल्या नागरिकांना मदत करू शकले नाही. ठाकरे यांचे कोकणा वरील प्रेम बेगडी आहे. एक लाख रोजगार देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील भाजपच्या आनंद मेळाव्यात बोलताना केला.
पुढे देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भराडी देवीने कौल दिल्याने राज्यात आमची सत्ता आली. या मेळाव्याचे भाजपचा विस्तार कसा झालाय, याचे दर्शन घडते आहे. येथील आमदार आणि खासदार भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिपी विमानतळाचे खरे श्रेय नारायण राणे यांचे आहे. ठाकरे सरकारने अडीज वर्षात केलेली एक गोष्ट तरी दाखवावी. नैसर्गिक नुकसानीचे अडीचशे कोटी सुद्धा त्यांनी दिले नाही. माझ्या मुख्यमंत्री काळात मूलभूत कामांसाठी मुबलक निधी आम्ही दिला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोकणातील प्रेम बेगडे प्रेम आहे. त्यांनी कोकणचे लक्षात न येणारे नुकसान केले आहे. एक लाख रोजगार देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. खोटे सांगून लोकांना भडकाविले. आंबे होणार नाही. मासे मिळणार नाहीत, असे खोटे सांगितले. परंतु हा प्रकल्प आम्ही कोकणातच करणार आहोत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्याची पुढील २० वर्षाची वाटचाल होणार आहे. पर्यटन वाढीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल आणणार आहोत. गोव्या पेक्षा सुंदर समुद्र किनारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. त्यासाठीही प्रयत्न करू. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणलेल्या काजू बोडु प्रकल्पासाठी शासन निधी देईल. कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी विशेष नियोजन करीत आहोत. त्यात तुम्हाला काय पाहिजे, ते मागून घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील आनंद मेळाव्यात बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page