जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी ताकद द्या

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे

⚡मालवण ता.०४-: २०१४ पूर्वी काही पक्ष म्हणायचे कोकणात भाजपचे काय आहे ? आजची उपस्थिती पाहिल्यावर लक्षात येईल, कोकणात भाजपाचे काय आहे , ते समजेल. कोकणातील युवक नोकरी निमित्त होणारे करणारे स्थलांतर थांबविण्याचे काम नागरिकांना करायचे आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रकल्प होऊ घातले आहेत. त्याला आपल्याला विरोध करायचा नाही. जिल्ह्याला विकासासाठी वेगळी आणि विशेष ताकद दिली पाहिजे. यासाठी आपण स्वतः लक्ष द्यावे. कोकणातील तरुणांचा विश्वास तुमच्यावर आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आनंद मेळाव्यात बोलताना केले.

You cannot copy content of this page