माजी खास निलेश राणे यांचा आनंद मेळाव्यात आरोप
मालवण ता.०४-:
नजर फिरवली तरी कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत। कोरोना नंतर एवढा मोठा मेळावा घेण्याचे धाडस फक्त भाजप करू शकते। साडे आठ वर्षे विकासात मालवण-कुडाळ मागे गेला आहे. आमदार आणि खासदार आपले नाहीत. हा बँक लॉक केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरून काढू शकतात. महाराष्ट्रात पहिल्यांदा विरोधकांना पर्सनल छळण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केला असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी नाव न घेता आंगणेवाडी येथे आनंद मेळाव्यात बोलताना केला.
पुढे बोलताना निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय ही टॅग लाईन चांगली आहे. मात्र, पहिलीत आलेला विद्यार्थी थेट दहावीत जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे आजची स्थिती पाहताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे श्रम विसरून चालणार नाही. त्यांनी गावागावात कार्यकर्ते तयार केले आहेत.
