मुंबईत भाजपचाच महापौर असेल

आंगणेवाडी येथील आनंद मेळाव्यात मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा विश्वास

मालवण ता.०४-:मुंबई नगर पालिकेत गेली अनेक वर्षे भ्रष्टाचार होत आहे. गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भूरटेगिरी केली. त्यांनी उंदीर मारण्यासाठी दोन प्रभागात एक कोटी रुपये खर्च केले. स्वतःला वाघ म्हणतात आणि उंदीर मारण्यात पैसे खातात, असा आरोप करीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी येणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षचे १५० नगरसेवक निवडून येतील. त्यानंतर घेण्यात येणाऱ्या मेळाव्यात एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या बाजूला केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची खुर्ची असेल. तर मध्येच भाजप महापौर यांची खुर्ची असेल, असा विश्वास व्यक्त केला. ते आंगणेवाडी येथील भाजपच्या आनंद मेळाव्यात बोलत होते.

You cannot copy content of this page