केसरकर यांच्या फुगा सावंतवाडी विधानसभेची जनता फोडेल…

खासदार विनायक राऊत यांची केसरकरांवर जोरदार टीका…

⚡सावंतवाडी ता.०४-: दीपक केसरकर यांनी आधी शरद पवार यांच्याशी नंतर उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली आता ते कोटी कोटी ची आश्वासने देऊन सावंतवाडीतील मतदारांशीही बेइमानी केली आहे, जसा भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीचा फुगा अमेरिकेतील हिडनबर्ग च्या पाच जणांच्या टीमने फोडला तसा केसरकर यांचा फुगामतदार फोडतील असा इशारा शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे बोलताना दिला तर येत्या सहा महिन्यात मिन्धे सरकार कोसळेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा विजय होईल पक्षचिंनाबाबतचा निकाल लवकरच लागेल यासाठी सर्वोच्च न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागू अंतिम विजय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे चाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते सावंतवाडी येथे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच काही थोडक्या मताने पराभूत झालेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लक्ष केले केंद्रीय तपास यंत्रणेवरही त्यांनी तोप डागली ते म्हणाले दीपक केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटीच्या उद्घाटना चे गाजर जनतेला दाखवले तसेच एक लाख सेट टॉप बॉक्स, चष्म्याचा कारखाना तिलारी बुडीत क्षेत्रात दोनशे एकर जागा घेऊन पर्यटन विकास पाणबुडी आधी आश्वासने दिली रुग्णसेवा महत्त्वाची असताना नको त्या गोष्टींची घोषणा केली मात्र ते अपुरे ठेवले जनतेला जे हवे आहे ते दिले नाही आणि आता मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला आपले स्वतःची छबी उभे करत आहेत पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला आणि आता जिथे दाढीवाले जातात त्यांच्या आजूबाजूला आपले बावले उभे करत आहेत शिवसेनेला शहाणपणा सांगायला यांना अक्कलदाड येते अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.

सावंतवाडी येथील आदिनारायण मंगल कार्यालयामध्ये सावंतवाडी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि थोडक्यात पराभूत झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख संजय पडते महिला महिला जिल्हा संघटक जानवी सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ वेत्ये सरपंच गुणाजी गावडे युवा सेना उपजिल्हा संघटक सागर नानोसकर तालुका संघटक योगेश नाईक जिल्हा संघटक शब्बीर मणियार उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार शहर प्रमुख शैलेंद्र गवंडकर तालुका संघटक रश्मी माळवदे शहर संघटक श्रुतिका दळवी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर ओटवणे सरपंच दाजी गावकर समीरा खलील हिमांशू परब आबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page