भाजप आ नितेश राणे यांनी केले स्वागत;केंद्रीयमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर होते सोबत
⚡मालवण ता.०४-: आंगणेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आई भराडी देवीचे दर्शन घेतले. दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपचे आम. नितेश राणे यांनी स्वागत केले.
या दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खास. श्रीकांत शिंदे, माजी खास. नीलेश राणे, आम. कालिदास कोळमकर, रवी फाटक, ब्रिगेडियर सुधीर सावंत, भाजपचे प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, मनीष दळवी, अतुल काळसेकर, आदी उपस्थित होते.
