अनुष्का चौगुले, राजदीप वाणी, मयुरेश धुरी यांनी मारली बाजी
मालवण ता.०३-:
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण आयोजित इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत प्रथम क्रमांक अनुष्का बिभीषण चौगुले (२४६) प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा, द्वितीय राजदीप दिपक वाणी (२४४) शाळा नांदरूख आंबडोस, तृतीय मयुरेश विद्यानंद धुरी (२१४) शाळा-आचरा पिरावाडी यांनी मिळविला आहे.
कै.राजेंद्र ठाकूर गुरुजी स्मरणार्थ कु.ऋतूपर्णा ठाकूर पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी मालवण तालुक्यातील १४ परीक्षा केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी स्पर्धा प्रमुख विनीत देशपांडे, संजय जाधव, दयाळ मेस्त्री, भागवत अवचार, विकास कपाटे व वैशाली साठे यांचे सहकार्य लाभले. ही सराव परीक्षा यशस्वी होण्यासाठी मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांनी सहकार्य केल्याबद्दल तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर, तालुका सचिव संतोष परब यांनी आभार व्यक्त केले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार संघटनेच्या तालुका मेळाव्यामध्ये करण्यात येणार आहे.
या परीक्षेत चतुर्थ क्रमांक अस्मी सुधीर पाटील (२०८) शाळा-तोंडवळी वरची, पाचवा क्रमांक गौरी रत्नकांत उदगीरे (२०८) शाळा- आचरा पिरावाडी, सहावी श्रावणी गंगाराम पोटघन (२०६) शाळा-आचरा पिरावाडी, सातवी नुर्वी गिरीष शेटगे (२०२) शाळा-आचरा नं.1, आठवी जान्हवी बापू भोसले (२०२) शाळा-आंबडोस व्हाळवाडी, नववी स्वरा नित्यानंद तळवलकर (१९८) शाळा- आचरा पिरावाडी , दहावी नंदिनी अरूण आंबेरकर (१९६) शाळा-मसुरे कावा अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
