तालुक्यातील १५३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती सराव परीक्षा

⚡वेंगुर्ला ता.०३-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका वेंगुर्लाच्यावतीने पूर्व माध्यमिक (इयत्ता ५ वी) व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा २९ जानेवारी रोजी वेंगुर्ल हायस्कूल येथे घेण्यात आली.


ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतःमोफत होती. या परीक्षेसाठी परीक्षा प्रमुख म्हणून शिक्षक परिषद जिल्हा महिला प्रमुख सुरेखा शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी तालुक्यातील पूर्व माध्यमिक ८८ तर माध्यमिक ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिषदेचे तालुका अध्यक्ष किशोर सोनसुरकर, उपाध्यक्ष सुनिल जाधव, सचिव अशोक काळे, सदस्य सुनिल जाधव, रमेश वाघमारे, साक्षी वराडकर, स्वप्नाली मुननकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डि.कांबळे यांनी सहकार्य केले. या स्पर्धेचा निकाल व्हॉट्सप ग्रुपवर ४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page