तर्सेबाबर्डे प्रशालेत 5 वी ते 7 वीच्या मुलांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

कुडाळ ता.०३-:जिल्हा परिषद शाळा तर्सेबाबर्डे प्रशालेत दिनांक 3 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत 10 दिवसांचे संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संगणक ही काळाची गरज असल्याने ग्लोबलच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 5 वी ते 7 वी या वयोगटातील 35 मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले आहे. यावेळी ग्लोबलचे संगणक प्रशिक्षक स्वप्नील नाईक यांनी संगणकीय सरावसत्रे मुलांकडून करून घेतली. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शेडगे, श्री. सर्पे तसेच बांदेकर मॅडम यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ग्लोबलचे व्यवस्थापक प्रसाद परब, प्रशिक्षक स्वप्नील नाईक, सहाय्यक उमेश गावडे, व शिक्षकवृंद उपस्थित होते.

You cannot copy content of this page