⚡मालवण ता.०१-: आंगणेवाडी येथील राष्ट्रीय काँग्रेस बूथ अध्यक्ष समीर सतीश आंगणे यांची मालवण तालुका काँग्रेस कमिटी च्या मसुरे विभागीय अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे
देशाचे राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेतृत्व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू झाली असून महाराष्ट्र राज्यात प्रांताध्यक्ष नाना पटोले हे राज्यभर दौरा करत आहेत या भारत जोडो यात्रेत तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद दिली जाणार आहे पक्षाचे विचार, इतिहास, धोरण हे आजच्या तरुणांच्या समोर मांडले जाणार असून याचीच सुरवात मालवण तालुक्यात देखील झाली असून समीर सतीश आंगणे यांसारख्या कार्यकर्त्याला मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या हस्ते आज विभागीय अध्यक्ष पद देऊन योग्य सन्मान करण्यात आला आहे
यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, ग्रामस्थ संतोष आंगणे, दयानंद आंगणे, नागेश मोंडकर आदि उपस्थित होते
