⚡मालवण ता.३०-: तळाशिलवाडी तोंडवळी (खालची) येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापनेचा ४५ वा वर्धापन दिन सोहळा १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त १ रोजी पहाटे ४ वा. अभिषेक सोहळा, सकाळी ७ वा. शरयु घाडी (मुणगे) संचलित नाम अमृत गायनाचा कार्यक्रम ९ वा. महापूजा, आरती, तिर्थप्रसाद, १० वा. हरिनाम दिंडी, सायंकाळी ५ वा. बुवा हृदयनाथ गावडे (कुडाळ) यांचे कीर्तन, ६ वा. ग्रामस्थांचे भजन, रात्री १० वा. मान्यवरांचा सत्कार सोहळा, १०.३० वा. पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा, गोवा प्रस्तुत ३ अंकी संगीत पौराणिक नाटक ‘जय जय गौरी शंकर’ सादर होईल.
२ रोजी सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. शालेय मुलांचा गुणगौरव सोहळा, १०.३० वा. विनोदी नाटक ‘वासूची सासू’ ३ रोजी दुपारी १२ वा. महाप्रसाद, ३ वा. तळाशिलवाडी मर्यादित महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा. रात्री १०.३० वा. विनोदी नाटक ‘ईला अंगावर घेतला खांद्यावर.’ ४ रोजी रात्री १० वा. सामाजिक नाटक ‘प्रेम करावं पण जपून, ५ रोजी रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा (एकेरी) तसेच १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत रोज सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होईल. भाविकांसाठी मोफत होडीची व्यवस्था (अभिषेक सोहळा पहाटे ५ ते ७ या वेळेत) करण्यात येणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
