⚡मालवण ता.३०-: तारकर्ली काळेथर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज यांच्या मठामध्ये पुनः प्रतिष्ठापना सोहळा दि. २ व ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दि. २ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून गणेश पूजन, मातृका पूजन, कलश प्रतिष्ठापना, प्रासाद वास्तू स्थापना, होमहवन, दुपारी आरती तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वा. श्री स्वामी कृपा महिला वारकरी दिंडी भजन, कातवड (बुवा मंगेश नलावडे, पखवाज – गौरव चव्हाण), रात्री ८ वा. विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर ३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून देवता पूजन, शिखर प्रतिष्ठापना, मूर्ती/पादुका प्रतिष्ठापना अभिषेक, दुपारी आरती, महाप्रसाद, भवानी प्रासादिक भजन मंडळ, सायंकाळी डीचोलकरवाडी आंबेरी यांचे भजन, रात्री ८.३० वा. त्यानंतर रात्री सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
तसेच रात्री १० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचे अजिंक्यतारा भाग – २ हे नाट्य सादर होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू साई सेवा समिती तारकर्ली काळेथर यांनी केले आहे.
