कोळब शाळेत मराठी संवर्धनासाठी विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.३०-: कोळंब केंद्रशाळेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणतर्फे गाणी, गप्पा, गोष्टी हा खास मुलांसाठी कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मराठी भाषेचे आद्य कवी केशवसुतांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका कदम यांच्या उपस्थितीत सदानंद कांबळी यांनी पुष्पहार अर्पण केला. कोमसाप मालवणचे कार्यकारिणी सदस्य कांबळी यांनी मराठी भाषेची लिपी स्वर, व्यंजने याबाबत गप्पांद्वारे मुलांशी संवाद साधला. ‘जग हे सारे सुंदर आहे’ या गाण्याबरोबर स्वतः तयार केलेली बालगीते. साभिनय सादर करून गोष्टींद्वारे मुलांचे मनोरंजन केले. वाचनाचे महत्व मुलांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ. कदम, सौ. केणी, ग्रामस्थ सूर्यकांत कवटकर यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page