सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची १ रोजी सभा

⚡मालवण ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन, मालवणची सभा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता येथील तालुका स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या सभेला जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे व प्रताप बागवे मार्गदर्शन करणार आहेत. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page