मनसे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश..
⚡बांदा ता.२९-: शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे मंजूर काम आजपासून अखेर सुरू झाले.मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सदर काम आठ दिवसांत सुरू करा असा इशारा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्षात कामास सुरुवात केली. याची पाहणी गुरुदास गवंडे यांनी केली.
निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची भेट घेतली होती. आजपासून शेर्ला-निगुडे-सोनुर्ली या ठिकाणी मोरींना (पुल) पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले. संबंधित कामाची पाहणी गुरुदास गवंडे यांनी केली. तसेच संबंधित ठेकेदाराला काम व्यवस्थित व उत्तम दर्जाचे झाले पाहिजे अशा सूचना केल्या. तसेच शेर्ला-कापईवाडी रस्तावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले.
