जि.प.पू.प्राथ. शाळा न्हैचिआड मध्ये 30 व 31 रोजी शतक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२९-: जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा न्हैचिआड या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत यानिमित्त ३० व ३१ जानेवारी या दोन दिवशी शतक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दि.३० रोजी सकाळी ८.३० वा. शाळा प्रवेशद्वार उद्घाटन, ९ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, ३ वा. भजन, तिळगुळ समारंभ, सायं. ६ वा. वेंगुर्ला प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे व केंद्रप्रमुख बी.डी.अडुळकर यांच्या उपस्थितीत वार्षिक बक्षिस वितरण, रात्रौ ९ वा. माजी विद्यार्थी व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दि. ३१ रोजी सकाळी १० वा. माजी विद्यार्थ्यांचे कला सादरीकरण, माजी शिक्षकवृंदांचा सत्कार, ज्येष्ठ ग्रामस्थ सत्कार होणार असून यावेळी माजी जि.प.सदस्य दादा कुबल, गटविकास अधिकारी मोहन भोई, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र खांबकर, येवजन आल्मेडा व माजी सभापती अनुष्का कांबळी उपस्थित राहणार आहेत. सायं.४ वा. उद्योजक पुष्काराज कोले, उद्याजेक रघुवीर मंत्री, माजी आमदार शंकर कांबळी, माजी आमदार राजन तेली, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर, सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन, सत्कार समारंभ होणार आहे. रात्रौ ८.३० वा. दत्तमाऊली दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापकांसह शतक महोत्सव समितीतर्फे केले आहे.

You cannot copy content of this page