सूर्यनमस्कार स्पर्धेत स्मिता कोठावळे प्रथम

माधुरी नार्वेकर, शबाना शेख अनुक्रमे द्वितीय, तृतीय विजेत्या

⚡सावंतवाडी ता.२९-: घे भरारी फाऊडेशनच्यावतीने जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून २८ रोजी सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, तसेच त्यांनी आपल्या आरोग्या विषयी जागृत व्हावे, हा या मागचा उद्देश होता. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ श्रीमती तुपकर, डॉ रेवती लेले, सौ रेखा कुमठेकर आदी उपस्थित होते. ६५ वर्षाच्या स्मिता कोठावळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

द्वितीय क्रमांक माधुरी नार्वेकर, तृतीय क्रमांक शबाना शेख यांनी मिळविला. शिवानी औराती आणि रुचिता राठोड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. घे भरारी फाऊंडेशन अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्षा रिया रेडिज, खजिनदार अदिती नाईक, मेघा डूबळे, वैशाली कारेकर, शारदा गुरव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page