रोटरी क्लब चे आयोजन
वैभववाडी संजय शेळके
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने दिनांक 16 ते 17 फेब्रुवारी 2023 रोजी वैभववाडी महोत्सवाच्या आयोजन केले आहे. दुपारी 3 ते रात्री 11 वेळेत चालणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून खाद्यमहोत्सव, बाल महोत्सव ही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्या महोत्सवाचा लाभ तालुक्यातील विद्यार्थिनी महिला खेळाडूंना होणार असून वैभववाडी तालुक्याच्या सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर पडणार आहे. या महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण अशी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजित करण्यात आलेली आहे.
खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना त्यांचे खाद्यपदार्थ व साहित्य विक्री करण्यासाठी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे या खाद्य
महोत्सवात 24 स्टाॅल असून कोकणातील विविध खाद्यपदार्थ खवय्यांना खाण्यासाठी मिळणार आहेत व कोकणी पदार्थ साहित्य खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धा पुढील प्रमाणे
रस्सीखेच स्पर्धा या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातील एक संघ अपेक्षीत असून या संघामध्ये रशी खेच स्पर्धा होणार असून पंधरा खेळाडूंची टीम व एक कप्तान या संघात असणार आहे. स्पर्धा विजेत्यास चार फुटी ढाल व रोख तीन हजार रुपये पारितोषिक उपविजेत्यास तीन फुटी ढाल व रोख रक्कम 2000 पारितोषिक व तृतीय विजेत्यास दोन फुटी ढाल व रोख एक हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
सौंदर्य स्पर्धा ही स्पर्धा मुलींसाठी वैभव कन्या महिलांसाठी वैभव लक्ष्मी तरुणांसाठी वैभव रत्न व उभयतांसाठी वैभववाडी आयडाॅल अशा चार विभागांत होणार असून स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे.
दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता उद्घाटन समारंभ सायंकाळी 3.30 ते 7 या वेळेत रस्सीखेच स्पर्धा संध्याकाळी सात ते नऊ सौंदर्य स्पर्धा प्राथमिक फेरी व रात्री नऊ तीस ते अकरा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव.
17 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 ते 6 वेळेत रस्सीखेच स्पर्धा संध्याकाळी 7 ते 9 सौंदर्य स्पर्धा अंतिम फेरी रात्री 9 ते 9.30 सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार व विविध स्पर्धा बक्षीस समारंभ रात्री 9.30 ते 11 जिल्ह्यातील कलाकारांचा संशोधन महोत्सव.
या महोत्सवासाठी विशेष अतिथी म्हणून आमदार नितेश राणे रोटरी डिस्ट्रीक गव्हर्नर रो,बबन देशपांडे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,2023-24 चे रोटरी डिस्टीक गव्हर्नर रो नासीर भाई,डिस्ट्रीक हेड रो प्रणय तेली,असिस्टंट गव्हर्नर रो दिपक बेलवलकर, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक,आदी उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवाचे अधीक माहिती साठी संतोष टक मो 9423300274, संजय रावराणे मो 9422379345, विद्याधर सावंत मो 8459468693 यांचेशी संपर्क साधावा.
या वैभववाडी महोत्सवाचा तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान रोटरी क्लब ऑफ वैभववाडी अध्यक्ष संतोष टक्के सचिव संजय रावराणे व प्रशांत गुळेकर यांनी केले आहे.
