ध्यान अध्यात्म आरोग्यासाठी महत्वाचे

अभिजित सामंत यांचे प्रतिपादन

मालवण (प्रतिनिधी)

माणसाच्या शरीरातील मनोमय कोश ते आनंदमय कोश हे अध्यात्म आहे. केवळ आसने किंवा प्राणायम करणे म्हणजे अध्यात्म नव्हे. आपण सर्व संसारिक माणसे असल्याने विचारांमध्ये आणि जगण्यात चढउतार येत असतात, त्यामुळे ध्यान अध्यात्म हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे, असे प्रतिपादन अभिजित सामंत यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अभिजित सामंत यांचा अध्यात्मिक योगा- निरोगी आरोग्य यावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या समवेत डॉ. अनिल सिंग, शक्ती सिंग, डॉ. सारिका सिंग, सुदेश महाले, प्रा. डॉ. वंदना सामंत महाले आदी उपस्थित होते. यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेविका सौ. स्नेहा आचरेकर यांनी अभिजित सामंत व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी अभिजित सामंत म्हणाले, आपले शरीर पाच कोशातून बनले आहे. अन्नमय कोश, मनोमय कोश, विद्यानमय कोश, प्राणमय कोश आणि आनंदमय कोश हे पाच कोश आहेत. आपण जे शरीर पाहू शकतो ते म्हणजे अन्नमय कोश, औषधोपचार फक्त अन्नमय कोशावर केले जातात. मनोमय कोष ते आनंदमय कोष हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे फक्त आसन करणे किंवा प्रणायम करणे नव्हे. बरेच लोक म्हणतात की आम्ही ध्यान करतो. परंतु, आधी आपण पहिल्या पासून काय केले पाहिजे हे जाणून घेतले पाहिजे. आपला मेंदू काय करू शकतो हे अजून उलगडलेले नाही, त्याच्यावर शोध सुरू आहेत. आयुर्वेदा मध्ये आहार विहार जो प्रकार आहे जो सकाळपासून संध्याकाळचा प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page