स का पाटील महाविद्यालयात प्रजासत्ताकदिनी अनेकांचा सत्कार

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील स. का. पाटील भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी विभागामार्फत निवृत्त होणारे प्राध्यापक, कर्मचारी तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एनसीसी कॅडेट्स यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते झेंडावंदन केल्यानंतर एन सी सी विभागाच्या वतीने लेफ्टनंट प्रा. डॉ. एम आर खोत यांनी काही महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणारे प्रा. बी एच चौगुले व अधीक्षक ए .डी .कदम यांना पायलटिंग करत सन्मानाने स्टेजवर नेऊन त्यांचा एनसीसी विभागामार्फत प्राचार्य श्री ठाकूर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये प्रा. खोत यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनसीसी विभागामार्फत सन्मान देण्याची पद्धत चालू केलेली आहे. तसेच एनसीसी मध्ये चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार एनसीसी विभागामार्फत करण्यात आला. यामध्ये सिनिअर अंडर ऑफिसर प्रीती बांदल, तेजस पोळ, जुनिअर अंडर ऑफिसर नारायण मुंबरकर, पूर्वा कोयंडे, कार्टर मास्टर मिथील मोरवेकर, तृप्ती माडीये, कार्पोरल आणि सार्जंट अक्षता आचरेकर, अर्जुन मालवणकर, बिरू खरात, गोपाळ कावले अशा दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर फिटनेस ग्रुप मालवण यांच्यावतीने डॉ. गार्गी ओरसकर यांच्याकडून एनसीसी कॅडेट तेजस पोळ याला, डॉ .शुभांगी जोशी यांच्याकडून एनसीसी कॅडेट पूर्वा कोयंडे हिला तर डॉक्टर माळी मॅडम यांच्याकडून विनीत मंडलिक याला चांगला फिटनेस ठेवल्याबद्दल बक्षीस देण्यात आले.

यावेळी कॉलेजचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी, एनएसएस विद्यार्थी, फिटनेस ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page