सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्नं मालिकेत साकारत आहे भूमिका
⚡मालवण ता.२८-: लिटल थिएटर बालरंगभूमीच्या संचालिका सुधाताई करमरकर स्मृतिप्रित्यर्थ बाल कलाकार पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतील बालकलाकार रुची संजय नेरुरकर हिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुडाळ तालुक्यातील नेरुर गावची कन्या असलेल्या रुचीला हा पुरस्कार ७ फेब्रुवारी रोजी रात्री आंगणेवाडी येथील भराडी माता रंगमंचावर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बालनाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांनी दिली.
