गोवा बनावटीची दारू विक्री करताना एकावर कारवाई

कोलगाव येथील इसमाचा समावेश;सात हजारचा मुद्देमाल जप्त

⚡सावंतवाडी ता.२८-: बेकायदा गोवा बनावटीच्या दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कोलगावात एकावर कारवाई केली आहे. यशवंत सावंत रा.कोलगाव फणसवाडी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून ७ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज दुपारी करण्यात आली असून येथील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page