शिडांची आणि बत्तीची जत्रा म्हणून प्रसिद्ध
⚡वेंगुर्ले ता.२८-: वेंगुर्ला येथील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रौत्सव माघ शुद्ध अष्टमी, रविवार दि.२९ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त पहाटेपासून नवस फेडणे, झेंडे, केळी, नारळ अर्पण करणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
तसेच रात्रौ “गॅसबत्ती’च्या प्रकाशामध्ये पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. जत्रौत्सवाच्या पाश्र्वभूमीवर वेंगुर्ला स्टॅण्ड परिसर ते पेट्रोलपंपापरिसरात खेळणी, मिठाई तसेच अन्य गृहपयोेगी वस्तूंची दुकाने मांडण्यात आली आहेत. तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.
