४० कोटी नळ योजनेची निविदा मॅनेज

माजी खा निलेश राणे यांची व्यक्त केला संशय;पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याची केली मागणी

मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील नगरपालिकेच्या सुमारे ४० कोटी रक्कमेचे धामापुर नळपाणी योजनेचे काम शासनाने मंजुर केले आहे. या कामाचे टेंडर मालवण नगरपालिकेने मागील महिन्यात मागवले असून मिळालेल्या तक्रारीनुसार हे टेंडर मॅनेज केले गेले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया करण्याची मागणी भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

अधिकाऱ्यांचे काही ठराविक कंत्राटदारांसोबत आर्थिक व्यवहार झाले आहेत अशी देखील चर्चा आहे. इ टेंडर प्रणाली असुनही नळपाणी योजनेचे काम बोगस कंत्राटदाराकडुन करून घेण्याचे कट कारस्थान काही राजकीय व शासकीय लोकांनी केले असल्याचे दिसत आहे. असे झाल्यास नळपाणी योजनेचे ४० कोटी पाण्यात जातील आणि सर्वसामान्य जनतेला भविष्यात त्रास भोगावा लागेल. त्यामुळे टेंडर प्रक्रियेची योग्य प्रकारे चौकशी करुन सदोष निविदा रद्द करावी व पारदर्शक प्रक्रियेनुसार करावी अशी आपली मागणी आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र भूमिका घेतली जाईल. असे पत्र श्री. राणे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना पाठवले आहे.

You cannot copy content of this page