पटकाविला मिस इंद्रधनु २०२३ किताब
देवगड ता.२७-:
इंद्रधनू देवगड (रजि.) आयोजित व माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अॅड. सौ. प्रणाली मिलिंद माने यांच्या सहकार्याने येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहासमोरील भव्य रंगमंचावर गुरुवारी पार पडलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत रेडी येथील पूजा भिवा राणे हिने ‘मिस इंद्रधनु २०२३ चा किताब मिळवित प्रथम व कमांकाचा बहुमान मिळविला. अॅड. सौ. माने व मिलिंद माने यांच्या हस्ते तिला रोख १५ हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
इंद्रधनू देवगड आयोजित व नगरसेविका ऍड. सौ. प्रणाली माने यांच्या सहकार्याने प -जासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेठ म ग हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प क्षागृहासमोरील पटांगणावर आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मुलांसाठी फनीगेम्स व खवय्यांसाठी खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते. आनंद मेळ्यांतर्गत महाराष्ट्र, गोवा राज्य मर्यादित मिस इंद्रधनू सौंदर्यवती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन अॅड.प्रणाली माने यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर मिलिंद माने, इंद्रधनू संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, परीक्षक मथुरी राणे (मुंबई). हेमंत मराठे (सावंतवाडी) व सौ. तनया केळकर (देवगड), अक्षय चाळके (रत्नागिरी) आदी उपस्थित होते. मिस इंद्रधनू सौंदर्यवती स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त ध्यानी मोहनलाल पटेल (देवगड) हिला रोख ७ हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन अध्यक्ष कुळकर्णी यांच्या हस्ते गौरविण्यात जाले. तर तृतीय व माकप्रात भक्ती सदानंद जामसंडेकर (सावंतवाडी) हिला रोख ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत ‘बेस्ट हेअर स्टाईलसाठी पूजा सदाशिव म्हादळकर (कुडाळ), बेस्ट ॲपिरियन्स’साठी ऋतुजा मारुती जाधव (रत्नागिरी), बेस्ट कॅटवॉकसाठी पूजा सुनील कुर्ले (राजापूर), बेस्ट कॉस्च्युम साठी संयुक्ता संदीप शेटये (रत्नागिरी), ‘बेस्ट स्माईल साठी सानिका मिलिंद चव्हाण (रत्नागिरी) यांना प्रत्येकी २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘बेस्ट मेकअप साठी हर्षदा दिनेश कांदळगावकर (देवगड) यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार नीतेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. ते म्हणाले, पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तरच येथील रोजगार व उद्योगधंद्यांना चालना मिळेल. ‘इंद्रधनू’ देवगड ही संस्था राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच त्यांनी अॅड. माने यांच्या कार्यकर्तृत्वाचे विशेष कौतुक केले. यावेळी इंद्रधनू संस्थेतर्फे आमदार राणे यांच्यासह अॅड. सौ माने, भाजप युवा मोर्चाचे देवगड-जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कलासार्थ इव्हेंट, रत्नागिरी यांच्या कलाविष्काराचे सादरीकरण झाले. यात देशभक्तीपर गीतांसह, कारोओके कोळी नृत्य, लावणी नृत्याचे बहारदार सादरीकरण कलाकारांनी केले. बक्षिस वितरणप्रसंगी वेदा हॉलिडे रिसॉर्टचे व्यवस्थापक अनिकेत बांदिवडेकर यांचा सत्कार इंद्रधनूचे अध्यक्ष कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय धुरी यांनी मानले.. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंद्रधनू संस्थेचे खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, दिनेश पटेल, वैभव केळकर, मिलिंद मोर्ये, आनंद रामाणे, राजीव पडवळ, भावेश पटेल, प्रशांत पटेल, यतीन कुळकर्णी, साईनाथ सुके, शंकर मुणगेकर यांच्यासह अमोल वंजारे, जयराम राऊळ, विशाल म्हादळकर यांनी विशेष मेहनत घेतली.
