जिल्हा बँक प्रधान कार्यालयात ‘ निधी आपके निकट ‘ कार्यक्रम संपन्न

⚡ओरोस ता.२७-: भविष्य निधी क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने आज ज विविध जिल्ह्यांमध्ये ‘निधी आपके निकट 2.0’चा कार्यक्रम संपन्न झाला.भविष्य निधी कार्यालय कोल्हापूर कार्यालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग प्रधान कार्यालय ओरोस य़ेथे आयोजित केला होता.

या कार्यक्रमात विविध आस्थापनांचे प्रतिनिधी कर्मचारी पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास सर्वांना भविष्य निधी कायदा व नवीन तंत्रप्रणाली याविषयी माहिती दिली गेली.

तसेच सर्वांच्या शंका विचारात घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये प्रयास योजनेअंतर्गत रिटायरमेंट दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व नाबार्ड जिल्हा नाबार्ड प्रबंधक अजय थुटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच हा कार्यक्रम डिस्ट्रिक नोडल ऑफिसर श्रीकांत बरगे सेक्शन सुपरवायझर सुनील उपाध्ये, बालाजी साळुंखे व विकास यमगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

You cannot copy content of this page