⚡कणकवली ता.२७-: केंद्रशाळा भिरवंडे नं. 1 जि. प. प्राथमिक शाळेमध्ये एक तास शाळेसाठी उपक्रम राबविण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी होत पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या परिसराची साफसफाई केली.
भिरवंडे नं. 1 शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेस उपस्थित सरपंच नितीन सावंत यांनी एक तास शाळेसाठी उपक्रमा राबविण्याविषयी माहिती दिली.
शाळा परिसर स्वच्छता,शाळेतील लोकसहभाग वाढावा, पालकांमध्ये अधिक जागरूकता यावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचे सांगितले, उपस्थित पालक व शिक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा केली.दर महिन्याच्या एका सोमवारी शाळेत सर्वांनी एक तास येऊन साफसफाई करायची असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
त्यानुसार सर्वजण शाळेत जमा झाले. श्री देव रामेश्वर व श्री महापुरुष यांना सांगणे करत शाळा परिसराची साफसफाई सुरू करण्यात आली. अवघ्या तासाभरात शाळेचा निम्म्याहून अधिक परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात नितीन सावंत, मंगेश सावंत, शिक्षक सतीश गोसावी,सुधाकर घाडीगांवकर, गोपाळ सावंत,ऋषिकेश सावंत,रंजना सावंत,अरुंधती सावंत,साक्षी सावंत,संपदा सावंत,नीलिमा जाधव,संगीता सावंत,संध्या सावंत,दीप्ती सावंत,प्रांजली कांबळे,विजया सावंत,कविता सावंत आदी ग्रामस्थ व पालक यांनी सहभाग घेतला. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शाळेत एकत्र येण्याचे ठरवत साफसफाईचे काम आटोपण्यात आले,यावेळी शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
